जेव्हा मानव प्रगत नव्हता
तेव्हा त्याच्या भोवताली घडणा-या घटना त्याला चमत्कारच वाटायच्या आणि ह्या सर्व
घटना ईश्वरच घडवतो अशी त्याची समजूत होती. सर्व धर्मग्रंथातही असाच संदर्भ आहे. पण जसे जसे
विज्ञान प्रगत होत गेले, तसे तसे या घटनांचा अर्थ मानवाला कळत गेला. जरी मानवाला
विज्ञानाची प्रचीती आली असली तरीही अजूनही मानवाला विज्ञानाच्या अफाट कक्षेमूळे पूर्ण
विज्ञान उमगलेल नाही. शेती हा सरलेल्या सहस्त्रकातील तर इंटरनेट हा सरलेल्या शतकातील
सर्वात महत्वाचे शोध मानले जातात. अशाच प्रकारच्या वैज्ञानिक शोधांनी मानवी जीवन
हे फार सुखमय आणि सुलभ बनले आहेत.
शेती हा देशाच्या
अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक आहे. तसेच लोकसंख्येत दररोज वाढ होत आहे पण
पुरोगामी शेती व्यवस्थेत वाढत्या लोकासंख्येला अन्न पुरवण्या इतकी क्षमता नव्हती. आज
आपण विज्ञानामुळे संकरीत बी-बियाणे, जमिनीचा कस वाढवणारे खते, आणि अत्याधुनिक
अवजारे वापरून कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. सर्व बाबींचा
शास्त्रोत्र अभ्यास करून ठरऊ शकतो की कोणत्या जमिनीला कोणत पीक चांगल उत्पादन देऊ
शकेन तसेच त्या पिकाला किती पाणी, खत लागेल. तसेच प्रगत विज्ञानाच्या मदतीने आपण कुक्कुटपालन,
दुग्धव्यवसाय, गांडूळ शेतीसारखे अत्याधुनिक जोड-धंदेही करू शकतो.
पूर्वी प्लेग, कॉलरा
सारख्या जिवघेण्या साथीच्या आजारांमुळे गावचे गाव नष्ट व्हायचे पण
वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे आज हे आजार जवळपास नाहीसे झालेले आहेत. काही
वर्षापूर्वी ज्या शस्त्रक्रियाची मानव कल्पनाही करू शकत नव्हता अशा शत्राक्रिया आज
सुदूर तंत्रज्ञानाने (Remote technology) सहजरीत्या करता येतात. आज तर विज्ञान आणि तंत्रज्ञान ऐवढ प्रगत झाले आहे की आजारी व्यक्तीची तपासणी डॉक्टर ऐवजी एखादी मशीन करू शकते. कदाचित म्हणूनच
वैद्यकशास्त्र हे मानवाकरिता वरदानच मानले जाते.
पुरातनकाळी वाहतूक फार मर्यादित होती कारण दळणवळणची साधन नव्हती. विज्ञानाच्या प्रगतीमुळे दळणवळणची
साधन उपलब्ध झाली त्यामुळे मानवाच्या कामात गतिमानता आली, परिणामी मानवाची आर्थिक
प्रगती झाली. तसेच विज्ञानामुळे माहितीची
आदान-प्रदान खुप सुलभ केले आहे. पूर्वी संदेश पाठवण्यासाठी कबुतर, घोडेस्वार, आणि
थोडे प्रगत स्थितीत पत्राचा वापर करीत असत पण आज आपण संदेश मोबाईल किंवा इमेलच्या
सहाय्याने एका क्षणात पाठवला जाऊ शकतो. इतकच नव्हे तर आज आपण एखाद्या ग्रहावरून
दुस-या ग्रहावर सहजपणे संदेश पाठवला जातो.
मानवजातीच्या
कल्याणासाठी फार उपयुक्त असलेले इंटरनेट, विद्युत, हिग्स बोसॉन, डीनए मँपिंग
यासारखे शोध हे विज्ञानाच्याच मदतीनेच लागले आहेत. अँटाँमिक बॉम्ब, डायानामाईट, जैविक
हत्यारे अशा विनाशकारी गोष्टी सुद्धा विज्ञानामुळेच तयार झाले आहेत.
जसे विज्ञान मानवाला
वरदान ठरत आले आहे तसेच ते काही कारणास्तव शापही ठरत आहे. जशी जशी मानव प्रगती
करतोय तशी तशी त्याची जीवन जगण्याची शैलीही बदलत चाललीय आणि त्याचाच वाईट परिणाम
मानवाच्या शरीरावर, कुटुंबावर तसेच त्याच्या जीवनावर होत आहे. आपण दररोज घेणारे
अन्न, फळे किती रासायनिकदृष्ट्या दुषित असतात आणि आपण याबाबत अनिभिग्न असतो. अशा
दुषित आहाराचा आपल्या शरीरावर अनिष्ट परिणाम होत आहे. यामुळेच २१ व्या शतकातील
पिढी ही शारीरिकदृष्ट्या अधिकाधिक कमकुवत होत चालली आहे. विज्ञानाच्या मानवी
जीवनावर होणा-या परिणामांचा जर समतोल नाही राखला तर हेच तारक विज्ञान मानव जातीला
मारक ठरेन.
अनेक शास्त्रज्ञांच्या
अथक परीश्रामातूनही अजूनपर्यंत कोणालाही पाण्याला प्रयोगशाळेत तयार करता आले नाही.
तसेच चंद्रविवर, बर्म्युडा, परग्रहवासीय ..... या सारखे अनेक गूढ अजूनही
विज्ञानाकडून सुटलेले नाहीत. बहुतेक म्हणूनच फ्रान्सिस बॅकॉन यांनी म्हटलं आहे की "If a man will begin with certainties, he shall
end in doubts; but if he will be content to begin with doubts, he shall end in
certainties".
विज्ञानामुळे आज मानवी जीवन हे पूर्वीपेक्षा सुखकर झालेले आहे म्हणून चला या
शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग मानवी जीवन अधिक सुलभ आणि सुखकर बनवण्यासाठी करुया!