December 15, 2011

अण्णा आता पुरे झाले ना...अण्णांना एक खुले पत्र

मी इथे एक पक्षनिरपेक्ष म्हणून माझे मत मांडत आहे, यात माझा कोणताही राजकीय हेतू नाही. आजपर्यंत अण्णा सरकारला पत्र लिहून त्यांचे मत मांडत होते, आज मी असाच प्रयोग करून अण्णांना काही प्रश्न विचारणार आहे की ज्यांचा लोकांनीही विचार करायला पाहिजे.

अण्णा, तुमची स्वतःला सिव्हील सोसायटीचे प्रतिनिधी म्हणवून घेणारी टीम अण्णा, ही पण धुतल्या तांदळा सारखी स्वच्छ नाहीये. खालिल काही प्रश्न तुमच्या करता-

१.       एका खेड्या गावात, तुमच्या वाढदिवसाला झालेल्या अवाढव्य खर्चाच स्पष्टीकरण? जे तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण अनाकलनिय आहे.
२.     तुमच्या संस्थेची नोदणी होण्यापूर्वीच तुम्ही संस्थेच्या नावावर निधी घेतला. हा गैरव्यवहार, भ्रष्टाचार नाही का?
३.     लोकपाल समितीवर झालेल्या सिव्हील सोसायटीच्या सदस्यांची नेमणूक जरा संशयास्पद वाटत नाही का? भूषण पिता-पुत्रांची शिफारस तुम्हीच केली आणि नंतर म्हणतात की भूषण कसे आहेत याची मी कशी काय ग्यारंटी कशी काय घेऊ? जर त्यांच्या चरित्राबद्दल(सर्व जगाला माहित आहेत पण) तुम्हाला माहित नसेल तर मग तुम्ही त्यांची शिफारस कशी काय करू शकतात? तुम्हीच म्हटले होते की ज्या व्यक्तीवर भ्रष्टचारचे आरोप असतील ते या समितीत नसतील मग भूषण पिता-पुत्र आणि तुम्ही सुद्धा या समितीत कसे? तुम्ही तर स्वतः कबुल केलंय की तुम्हाला कायद्याच ज्ञान नाही, तरीपण तुम्ही समितीत?
४.     शांती भूषण आणि अमरसिंग यांच्या संभाषणाची सीडी खरी आहेत, असा फोरेन्सिक लँबोरेटोरीचा रिपोर्ट आला.आता याला काय उत्तर द्याल?की आताही अस म्हणाल, सरकार आमच्या सहकार्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे?
५.    पहिले मोदी सरकारची कामाबद्दल तारीफ करतात, पण जेव्हा सहकारी दबाव टाकतात तेव्हा मोदी सरकार भ्रष्टाचारी आहेत असा आरोप लावतात. बहुतेक म्हणूनच तुम्हाला दुसरे गांधी म्हणतात.
६.      एकीकडे ३० जून पूर्वी मसुदा तयार करण्यासाठी सरकारवर दबाव टाकतात आणि दुसरीकडे रामदेव बाबा-रामलीला प्रकरणसाठी मिटींगवर बहिष्कार टाकतात.काय संबंध या २ ही बाबींचा? कपिल सिब्बल यांनी कडक शब्द वापरले तेव्हा तुम्ही वठणीवर आले. एवढंच नाही तर ९ जून च्या मिटींगला तुम्ही उपलब्ध नाही म्हणून ती मिटींग रद्द करायची विनंती केली. तुम्ही तर मुद्दाम हून हे सर्व करत तर नाहीये ना? जर ३० जून पर्यंत हा मसुदा तयार नाही झाला तर परत तुम्हीच सरकारला दोष द्यायला मोकळे.
७.    तुम्ही पब्लीसीटी म्हणून समितीतील सरकारी सदस्यांना खोटारडे आणि धोकेबाज बोलले, पण जेव्हा कपिल सिब्बल यांनी विचारले की सदस्य खोटारडे आणि धोकेबाज कसे? तेव्हा तुमच्याकडे काहीच उत्तर नव्हते. कपिल सिब्बलानी याच उत्तर बाहेरच्या पत्रकारांना द्या तर केजरीवाल बाहेर आल्यानंतर तर त्यांनी उत्तर देन सोडून जुनच रडगाण लावलं. जर तुम्हाला दुस-याना बदनाम करण्यात समाधान लाभात असेल तर ते जरा आवरा.
८.     तुम्ही सरकारवर दबाव आणून सर्व काम(कायदा) करण्याचा ज्या प्रयत्नाला तुम्ही लोकशाही म्हणवतात, पण तुम्ही संसदच्या सार्वभौमत्वावर दगा आणण्यासारखे आहे, असे नाही वाटत का तुम्हाला?
९.      काश्मीर प्रांत बद्दल वादग्रस्त भाष्य करणारे प्रशांत भूषण यांना माफ का केले?
१०.  किरण बेदी ची विमान तिकीट गैरव्यवहार आणि कम्पुटर ट्रेनिग गैरव्यवहार ही  गैरव्यवहाराची २ प्रकरण समोर आलीत, असे भ्रष्ट सहकारी चालतात कसे?
११.   माजी आय.आर्.एस. आणि मँग्सेसे पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल यांनी थकीत कर चे पैसे कुणाकडे परत करावे हे सुद्धा समजत नाही? ते आता एवढे मोठे झालेत की ते पैसे आपल्या सिनियर अधिकाऱ्याला न देता सरळ प्रंतप्रधानांन कडे पाठवतात.अशी अपेक्षा आहे का त्यांची की प्रंतप्रधानांनी त्यांचा थकीत कर भरावा.
१२.  अरविंद केजरीवाल तुम्हाला संसद पेक्षा मोठे म्हणतात तर ते संसदला कमी लेखून संसदचे सार्वभौमत्व हाणून पाडत आहेत, अस नाही वाटत तुम्हाला? मान्य आहे संसद जनतेसाठीच आहे पण तिचा तेवढा आदरही ठेवला गेला पाहिजे अस नाही वाटत तुम्हाला?
१३.  तुमच्या कोअर टीम मधील पी.व्ही. राजगोपाल आणि राजिंदरसिंग यांनी तुमची टीम सोडून गेले, कारण तुमच्या टीममध्ये लोकशाही पद्धतीने निर्णय होत नाही. यावर काय बोलाल? हिस्सार पोटनिवडणुकीच च उदाहरण घ्या ना. मिटींग मध्ये कोंग्रेस विरोधात प्रचार करण्याचा प्रस्ताव झालाच नाही तरीपण तुम्ही प्रेस मध्ये सांगतात की कोंग्रेस विरोधात प्रचार करणार. जेव्हा मेधा पाटकर नाराज झाल्यात आणि त्या म्हणतात की असा प्रस्तावच नाही झाला. मग नेहमी प्रमाणे तुम्ही कोलांटउडी घेतली की ते माझ वैयक्तिक मत होत. आणि आश्चर्य जेव्हा वाटल, मत तुमच होत आणि तुम्ही राळेगणसिद्धी मध्ये आणि तुमचे सहकारी अरविंद केजरीवाल आणि मनिष शिसोदिया हिस्सार मध्ये.
१४. राळेगणसिद्धी दारू पिणा-या ला आम्ही बदवडून काढतो आणि आमच्यात शिवाजींचे ही गुण आहेत असे म्हणणारे सैन्यातील जवान अण्णा, तुम्ही अहिंसक कसे?
१५. तुम्ही म्हणतात आत्मशुद्धी करता मौन व्रत करत आहे. पण राजू परुळेकर तर म्हणतात की अण्णांनी हिस्सारला न जाण्यासाठी हे व्रत केले (तसा त्यांनी पुरावाही सादर केला). पण मला हे ही समजले नाही की तुम्ही मौन व्रत सोडण्यासाठी राजघाटला का गेलात?ते तर तुम्ही राळेगणसिद्धीमध्येही सोडू शकले असते.
१६.  भ्रष्टाचाराचा सर्व राग आधी सरकारवर नंतर संसद वर नंतर कोंग्रेस वर. अस का? दुसरे लोक भ्रष्टाचारी नाहीत का?

यावर माझ निर्मळ मत अस की दुस-यावर आरोप करण्याआधी आपण किती स्वच्छ आहोत हे तपासून घ्याला पाहिजेत. बायबल मध्ये ही असच म्हटलं आहे की जर आपण मलीन असलो तर आपल्याला दुस-यांना खडे मारण्याचा अधिकार नाही.

सध्या प्रंतप्रधान आणि सरन्यायाधीशच्या मुद्द्यावरून वाद चालू आहे, त्यावर माझ मत अस की, प्रंतप्रधान हे लोकशाहीतील राजशिष्टाचारानुसार एक अतिमहत्वाच पद आहे. तसेच सरन्यायाधीश हे ही न्याय पालिकेतील सर्वोच्च पद आहे आणि या पदांचा मान हा राखलाच गेला पाहिजे. माझ्या मते प्रंतप्रधान आणि सरन्यायाधीश सुद्धा लोकपाल च्या कक्षेत यायला पाहीजे पण त्यांच्या विरुद्ध महाभियोग सारखी प्रक्रिया पारित झाल्या नंतरच. जर प्रंतप्रधान आणि सरन्यायाधीश सुद्धा लोकपालच्या कक्षेत आणल तर उद्या तर कुणीही आणि केव्हाही त्यांच्या वर आरोप करेन आणि त्यांना काम कारण अशक्य होऊन जाईल. जसे आता माहिती अधिकाराचा गैरवापर होऊन सरकारी अधिका-याना त्रास दिला जातो, असा गैरवापर लोकपाल बद्दल ही होऊ शकतो.

याबरोबरच माझे प्रामाणिक मत आहे की, ‘आणि दर्जाचे सुद्धा कर्मचारी लोकपाल सोडून दुस-या कोणाच्यातरी(लोकायुक्य किंवा दुसरा पर्याय) नियंत्रणखाली यायला हवेत, कारण सामान्य लोकांना याच दर्जाच्या लोकांपासून त्रास होतो. लोकपालच्या च्या नियंत्रणा खाली सर्वाना आणणे कठीण जाईल, तसेच सी.बी.आय. इतकीच प्रभावी सरकारी यंत्रणा लोकपाल सोबत असावी. ह्या दोन गोष्टी सोडून जर तुमच्या म्हणण्यानुसार जर लोकापालाचे कार्यक्षेत्र ठरवलं तर तुम्ही लोकशाहीत हुकूमशहा करता जागा तयार करत आहे, की जे लोकशाहीला खूप घातक आहे.





No comments:

Popular Posts