December 15, 2011

खरच...प्रत्येक वेळेस सरकारच चुकत का?

आजकाल सरकारला दोष देण हे फँडच झालंय. फेसबुकच्या पोस्ट म्हणा की जीमेल चे इमेल्स म्हणा.....त्यात सरकारलाच दोष दिलेले असतात, आणि विशेष म्हणजे हे सर्व दोष सारासार विचार करून दिलेले नसतात. कारण आजकाल लोकांनी सदसद्विवेकबुद्धी वापरणच सोडलं आहे. जे एका व्यक्ती ने लिहून प्रकाशित केल तेच शेअर केल जात. त्यातील माहिती खरी की खोटी हे सुद्धा पडताडून पहिली जात नाही. मी पण संगणक क्षेत्रात काम करतो पण मी ह्याला माहिती तंत्राद्यानाचा तोटा म्हणेन.

मी मान्य करतो की, सरकारकडून चुकीचेही निर्णय घेतले जातात पण नक्कीच सर्वच नाही! इथे मला हे ही नमूद करावेसे वाटते की सरकार काही कठोर निर्णय ही घेतात, ते कदाचित आपल्याला चुकीचे वाटू शकतात. आणि ते चुकीचे वाटणे हे स्वाभाविकच आहे कारण आपण इतके स्वार्थी झालो आहोत की आपल्याला फक्त आपल्या स्वार्थाच्याच गोष्टी लक्षात येतात, पण सरकारला सर्व घटकांचा विचार करावा लागतो. पण आपण याकडे लक्षच देत नाही.


पेट्रोल च्या किमती वाढल्या की बरेच लोक सरकारच्या विरोधात बोलताना दिसतात, फेसबुक किवा जीमेल वर पेट्रोल च्या किमती बद्दल चुकीची माहिती शेअर करतात, अशाच काही लोकांना मी विचारलं की पेट्रोलचे भाव कशामुळे वाढतात? पण त्यांच्याकडे माझे समाधान होईल असे उत्तर नव्हते. मी अशांना एकच सांगू इच्छितो की, जर आपल्याला गोष्टींची माहिती नसेल तर वायफळ बडबड कशाला करायची? मराठी भाषेत याला पांडित्य म्हणतात. अशीच बरेच उदाहरण आहेत...मग ते लोकपाल बील असो वा परदेशी गुंतवणूकचा मुद्दा असो. आपल्याला सरकारला दोष देण्याची सवयच पडली आहे. मला मान्य आहे की, सरकार पेट्रोलवरील कर कमी करून पेट्रोलच्या किमती थोडया कमी करू शकते, पण याचा परिणाम जास्त दिवस टिकणार नाही, कारण पेट्रोलची कींमत कमी झाली की पेट्रोलची मागणी वाढेल तसेच मागणी आणि पुरवठा यात तुट वाढली की परत पेट्रोलचे भाव वाढतील कारण पेट्रोलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ठरतात.(कापूसच उदाहरण घ्या ना, चालू वर्षात कापूस चे भाव ३००० हून ८००० पर्यंत गेले) यात नुकसान कुणाच होईल? सरकारच! कारण काही दिवसांनी किमती परत जवळपास जशाच्या तशाच होतील आणि सरकारला कर मधून येणारे पैसे ही जातील मग सरकारला पैसे येणार कुठून? एका सोसॅकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात फक्त ४.५% लोक इमानदारीने प्राप्तीकर भरतात. ही माहिती मी तपासली नाहीये पण हे प्रमाण थोड जास्त असल तरीही पूर्ण लोकसंखेच्या मानाने फार कमी आहे.जर अशी परिस्थिती असेल तर सरकार पेट्रोलच्या करातून देश चालवण्याकरता पैसे मिळवत असेल तर गैर काय?


मलेशियाचे माजी प्रंतप्रधान भारतात येऊन म्हणतात की, भारताने मुक्त व्यापार स्वीकारला आहे पण अजूनही काही क्षेत्र त्यांनी बंदिस्त करून ठेवलेत म्हणून चीनच्या तुलनेने भारताची प्रगती कमी होते, पण हे आपल्या देशातील विरोधी पक्ष आणि डाव्या ना कोण समजावेल?


६५ व्या स्वतंत्र दिनाच्या ध्वजवंदनाच्या दिन निमित्ताने केलेल्या भाषणात मु. जे. महाविद्यालाचे प्राचार्य राव सरांनी असे म्हटले होते की स्वातंत्र मिळून आपल्याला ६५ वर्ष झालेत, आपण आता चांगले प्रगल्भ झालो आहोत, आता वेळ आली आहे की आपण अधिकार आणि हक्कानं पेक्षा कर्तव्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. खरच सर, मलाही पटत, आज आपण इतके स्वार्थी झालो आहोत की आपण फक्त आपलाच विचार करतो, आपले अधिकार, आपले हक्क पण यात आपण आपले कर्तव्य विसरून चाललो आहोत. आपण हे विसरून चालले आहोत की आपल या देशाकडे, या धरतीमातेकडे, आपल्या धर्माकडे, आपल्या समाजाकडे काही दायित्व आहे. अमेरिकेतील लोकांना त्यांच्या अधिकार, हक्काबरोबर कर्तव्यांची ही जाणीव आहेत आणि ते तसे त्यांचे पालन करतात. आपण पाश्चिमात्य देशांकडून नेहमीच वाईट गोष्टी शिकतो पण त्यांच्याकडे अशा चांगल्या गोष्टी सुद्धा शिकण्यासारख्या आहेत.

जाता जाता.....
हा लेख लिह्ण्यामागे उद्देश होता की, आपण काहीही आणि कुणाविरुद्ध भाष्यकरण्या आधी हे तपासून घेतले पाहिजे की आपण जे भाष्य करतोय ते खरोखर बरोबर आहे का? तसेच आपण आपले कर्तव्येही जाणून घेतले पाहिजेत.

प्रत्येक गोष्ट सरकार करेन, असे समजू नका. समाज म्हणून, माणूस म्हणून आपल्याला वैयक्तिक पातळीवरही हे काम करावे लागेल.ही सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे.-जॉन एफ. केनेडी, माजी राष्टपती, अमेरिका.

No comments:

Popular Posts