April 15, 2011

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना आत्मपरीक्षणाची गरज...

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हा लेख लिहितो आहे. या लेख मध्ये माझे मत मांडायचा प्रयत्न करत आहे, मी यात काही कटू सत्य लिहित आहे पण कुणा दुखवायचा माझा मुळीच हेतू नाही......


८ मार्च च्या सकाळ ची सुरुवात लोकमत च्या पहिल्या बातमीने झाली. त्यात महिला बाबतीत  काही survey चे results दिलेले होते ते वाचुन आनंद झाला. बहुतेकांनी ते results वाचले असतील पण मी त्यातील वेगळा view मांडणार आहे.

मी काही दिवसापूर्वी एक talk show बघितला, त्यात एक महिलेच म्हणण होत कि या वर्षी च्या budget मध्ये महिला करता काहीच ठोस केलेले नाही त्यामुळे महिलांची प्रगती होत नाहीये. मी मान्य करतो की खरच budget मध्ये असे काहीच केलेले नाही, पण.......जर डॉ. कल्पना चावला (the only person who traveled space twice), इंदिरा गांधी (honored as “the only man in parliament”), डॉ. किरण बेदी (India’s first and highest ranking woman police officer) यांनी ही जर महिला करता provision असलेल्या budget ची वाट बघितली असती तर??? आज वरील नाव आपण इतक्या अभिमान ने घेऊ शकलो असतो? ज्यांना खरच काहीतरी करून दाखवायची तळमळ असते, ते अशी भाषणबाजी करत पण नाही आणि अशा चुकीच्या संकल्पना मांडत पण नाही. डॉ. किरण बेदी नी एका लेख मध्ये लिहील आहे की पहीले स्वतः चा विकास करा, मग दुस-यांचा.
यातून घ्यायचा भाग असा की आजकाल महिला, डॉ. किरण बेदी च्या वाक्याच्या जरा उलटच करत आहेत अस नाही वाटत? मी तर डॉ. किरण बेदी च्या वाक्याला पूर्ण पणे सहमत आहे. पहीले स्वतः चा विकास करा मग दुस-यांचा....कारण
१. जर आपण पूर्ण पणे सक्षम नसलो तर दुसरे आपल अस्तित्व मानत नाही. २. अशा पुढारी कामात आपणच मागे राहून जातो. (स्वतः चा विकास करण्याच limit स्वतः च ठरून घेतलं पाहीजे, कारण कुणाला स्वतः च्या खोट्या प्रशसेत मोठेपण(विकास) वाटतो तर...कुणाला भाषण बाजीत....)


माझ्या निदर्शनातील आलेला महिलांचा सर्वात मोठा आणि महत्वाचा मुद्दा असा की, जर तुम्ही एखाद्या (ओळखीच्या) महिलेला मुद्दाम चिडवा, तर ती तुम्हाला जास्त प्रतिकार नाही करणार पण जर का तुम्ही स्त्री जाती विषयी जरी एक शब्द ही काढला तर ती तुम्हाला फाडून खायला कमी करणार नाही. या बाबतीतच १ उदाहरण सांगायचं म्हटलं तर, तुम्ही जरा ३३% आरक्षण रद्द करण्याबाबतीत बोलून बघा...ते त्यांच्या शैली मध्ये तुमच्या अंगावर धावून येतील...तो आमचा हक्क आहे....इत्यादी इत्यादी....पण कुणी या गोष्टी चा समाजावर काय परिणाम होईल हे विचार केलाय??? जर सर्व क्षेत्रात आरक्षण झाल तर बेरोजदारी किती वाढेल हे सुद्धा विसरून चालणार नाही, आणि बेरोजदारी जर वाढली की त्याचे समाजावर वेगळे परिणाम होतील...चोरी चे प्रमाण वाढेल इत्यादी इत्यादी...
....मला नाही वाटत कुणी या सर्व बाबींवर विचार केला असेल....आणि जर कुणी केला असेल तर ते स्वार्था पोटी चूप बसले असतील....महिला चूप बसतील कारण महिला वर्गा ला राखीव जागा मिळतील म्हणून आणि पुढारी लोक त्याला समर्थन करतील कारण त्यात त्याचं नाव मोठ होईल...पण यात सामान्य जनतेच काय???....आधी जाती वरून...आता स्त्री-पुरूष वरून भांडण.....पुढे कशा वरून होईल देव जाणे....आपण समाजाला अजून मोठ्या दरीत ढकलत आहोत अस नाही वाटत?
जर तुम्ही महीला सक्षमीकरण आणि सबलीकरण चे पुरस्कर्ते असाल तर जे मूळ कारण आहे त्यावर जोर द्या ना....२०११ च्या जनगणने नुसार भारतात फक्त ६५% महीला साक्षर आहेत...बाकीच्या ३५% महिलान वर लक्ष केंद्रित करा ना....पण मला माहितीय या वर कुणी कृती कारण तर दूर विचार सुद्धा करणार नाही.

या लेख चा असा अर्थ नाही की मी स्त्री विरोधी आहे...मी फक्त अशा गोष्टी वर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला की ज्या गोष्टीवर बहुतेक लोक विचारही करत नाही...खर तर मी समान नागरी कायद्याचा समर्थक आहे. ज्यात स्त्री आणि पुरुषांना समान हक्क (आणि कर्तव्य) दिली आहेत. लोकमत मध्ये दिलेल्या survey मध्ये महिलांना त्यांच्या कुटुंबात मान मिळतो अशा म्हणणा-या ६५% महीला आहे...वाचून बर वाटल...पण मनाला नाही पटत की हे सर्व महिलांना ची स्थिती दर्शवित (कारण मी मानतो की statistics is always lie)गरीब वर्गा तील महिलांचा अभ्यास यात झालेला नसेल अस मला वाटत...पण ती ही परिस्थिती सुधारू शकते जर समान नागरी कायदा जर अस्तित्वात आला तर.......सर्वोच्च न्यायालयाने देखील भारतात समान नागरी कायद्याला समर्थकता दर्शवली आहे. पण हे राजकारणी लोक त्यांच्या स्वार्था करता अशा चांगल्या गोष्टी होऊ देत नाही. मी कॉंग्रेस विरोधी नाही तरीही सोनिया गांधी ना दोषी मानेन...publicity stunt म्हणून पंतप्रधान पद नाकारलं...नंतर स्त्री पुरस्कर्ती stunt म्हणून एका स्त्री ला राष्ट्रपती बनवलं...स्वतःला विचारा की...खरच प्रतिभाताई पाटील ह्या राष्ट्रपती पदा करता लायक होत्या??? उत्तर नाही असाच मिळणार.....जर तुम्हाला(राजकारणी लोकांना) दुसरा option मिळाला नाही म्हणून तुम्ही कुणालाही कोणत्याही पदावर बसवणार???...इथेच हे stunt प्रकरण थांबल नाही....सोनिया जी नी अजून एक कारनामा केला....लोकसभेतली पहिली महीला speaker म्हणून मीरा कुमार यांची निवड केली... speaker पदाची व्यक्ती कशी असायला हवी....जर महीलाच speaker म्हणून नेमायची असेल तर त्या पदाला लायक व्यक्ती नेमा ना.......मला मान्य आहे की मीरा कुमार यांचा अनुभव चांगला आहे आणि त्यांनी उच्चआयुक्त पदी काम केलेल आहे पण दुस-याही ब-याच महीला खासदार होत्या की ज्या speaker बनू शकल्या असत्या...त्यांना सोडून न बोलणारी व्यक्ती का??? अजूनही stunt चालूच आहे...आता ३३% आरक्षण......अशा या राजकारणी लोकांची मला चीड येते...हे राजकारणी स्वार्था करता जनतेचा विचारच करत नाही....महाराष्ट्र सरकार ने स्थानिक स्वराज्य संस्था करता ५०% आरक्षण जाहीर केल...पण फायदा काय??? या आधी महीला सरपंच करता आरक्षण नव्हत..नाहीये??? पण सत्य परस्थिती अशी की त्यांच्या नावा खाली दुसरेच सत्ता चालवतात....

महिलान वर अत्त्याचार होतात म्हणून ४९८(अ) कायदा आला...त्याचे खूप कडक स्वरूप होते जेणे करून महिला वरचा अत्याचार थांबवता येईल पण त्याच काय झाल?? आज अशी परिस्थिती आहे की या कायद्याचा गैफायदा घेऊन महीला खोट्या केस करतात. अस सिद्ध झालं की ९८% केसेस ह्या खोट्या असतात म्हणून सर्वोच्च न्यायालयाने याला कायद्याचा दहशदवाद म्हणून संबोधल आहे. आता पुरुषांच्या संरक्षणा करता ४९८(ब) कायदा येतोय की जेणे करून पुरूष वरील अत्याचार थांबवता येतील. आणि आपण म्हणतो की भारत हा पुरुषप्रधान देश आहे.

जर ही परिस्थिती बदलावायची असेल तर डॉ. किरण बेदी चे rule पाळा...स्वतः बदला आणि नंतर दुस-याना ही बदलवा... म्हणूनच मी म्हणतो की महिलांनी आत्मपरीक्षण केलच पाहीजे.

Popular Posts